आपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या एक महिन्याचे वेतन केरळ मधील पूरग्रस्तांसाठी दान देण्यात येणार आहे. या पक्षाच्या दिल्ली सरकारने कालच केरळला 10 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी आज ट्विटर अकौंटवरून आपल्या पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार आपले महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार आहेत असे जाहीर केले.

देशातील सर्वच नागरीकांनी केरळातील आपल्या पूरग्रस्त बांधवांसाठी यथाशक्‍ती मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. केरळातील लक्षावधी नागरीकांना पुराचा तडाखा बसला असून सुमारे सव्वातीन लाख नागरीकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)