आपच्या निलंबित खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश 

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने (आप) निलंबित केलेले पंजाबमधील खासदार हरिंदरसिंग खालसा यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. खालसा यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.

मागील लोकसभा निवडणुकीत खालसा आपच्या तिकिटावर पंजाबमधील फतेहगढ साहिब मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी भाजपचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलातून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. नंतर ते आपमध्ये दाखल झाले. मात्र, पक्षविरोधी कारवायांबद्दल आपने त्यांच्यावर 2015 मध्ये निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, झारखंडमधील राजदचे पूर्वाश्रमीचे नेते गिरीनाथ सिंह यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे वडील जनसंघाचे सदस्य होते. त्यामुळे आपल्या दृष्टीने भाजप प्रवेश म्हणजे घरवापसीच असल्याची प्रतिक्रिया सिंह यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)