आपच्या तीन खासदारांसह चौघांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज एकूण चार राज्यसभा सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यात आम आदमी पक्षाच्या तीन आणि भारतीय जनता पक्षाच्या एका सदस्याचा समावेश होता. आम आदमी पक्षाचे हे पहिलेच राज्यसभा सदस्य आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर राज्यसभेचे कामकाज सुरू झाले त्यांनतर हा शपथ कार्यक्रम झाला.

राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकैय्या नायडू यांनी यावेळी दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहणारा प्रस्ताव मांडला. मोहींदर सिंग कल्याण आणि खागेन दास या राज्यसभेच्या माजी सदस्यांचे नुकतेच निधन झाले आहे. ओएनजीसीच्या पवन हंस हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणात मृत्यू मुखी पडलेल्या सात जणांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतीय अंध क्रिकेट संघाने पाचव्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा प्रस्तावही यावेळी संमत करण्यात आला.

आज राज्यसभेचे कामकाज सुरू होण्यापुर्वी काही मिनीटे अगदोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभागृहात आगमन झाले. त्यावेळी त्यांनी विरोधकांच्या बाकांवर जाऊन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, गुलामनबी आझाद, शरद पवार, रामगोपाल यादव, ए. के अन्टोनी, आनंद शर्मा या नेत्यांशी हस्तांदोलन केले. प्राथमिक कामकाजानंतर राज्यसभेचे कामकाज 1 फेब्रुवारी पर्यंत स्थगित ठेवण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)