आपच्या एका उमेदवाराच्या निवडीवर कॉंग्रेसचा आक्षेप

नवी दिल्ली – राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) एन.डी.गुप्ता यांना दिलेल्या उमेदवारीवर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यासाठी लाभाच्या पदाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

दिल्लीतून राज्यसभेवर निवडून द्यावयाचा तीन जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. त्यासाठी आपने एन.डी.गुप्ता, संजय सिंह आणि सुशील गुप्ता या तिघांना उमेदवारी दिली. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केले. आता दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी एन.डी.गुप्ता यांच्या उमेदवारीवर हरकत घेत संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे.

-Ads-

एन.डी.गुप्ता यांची मागील वर्षी 30 मार्चला नॅशनल पेन्शन सिस्टीम ट्रस्टच्या विश्‍वस्तपदी नियुक्ती करण्यात आली. ते पद लाभाचे आहे, असा दावा माकन यांनी केला आहे. तसेच, लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत एन.डी.गुप्ता यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, गुप्ता यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतल्याबद्दल आपने माकन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. क्षुद्र स्वरूपाचा आक्षेप नोंदवून माकन सवंग प्रसिद्धी मिळवू पाहत आहेत, अशी प्रतिक्रिया आपकडून देण्यात आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)