आपचे नेते संजयसिंह यांच्या गाडीवर मध्यप्रदेशात हल्ला

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांच्यावर मध्यप्रदेशात छिंदवाडा येथे काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. स्वत: संजय सिंह यांनीच ही माहिती दिली. त्यांना काळे झेंडे दाखवत काहीं जणांनी त्यांची गाडी अडवल्याचा व्हिडीओ त्यांनी प्रसारीत केला आहे. या निदर्शकांपैकी काहींनी माझ्या गाडीचे दार उघडून मला बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी म्हटले आहे. ही घटना घडली त्यावेळी काही पोलिस तेथे हजर होते त्यांनी तेथे हस्तक्षेप करून निदर्शकांना पळवून लावले. संजय सिंह हे आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य आहेत. त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिलेली नाही किंवा त्या विषयी कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव त्यांनी घेतलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)