आनेवाडी टोलनाक्‍यावर मेगाब्लॉक

रविवार असल्याने वाहनांच्या रांगा; प्रवाशांनी केला संताप व्यक्त
सातारा,दि.7(प्रतिनिधी) -पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्‍यावर रविवारी सकाळी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला.
शनिवार, रविवार सलग सुट्टी असल्याने महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली होती. मात्र याचा अंदाज महामार्ग पोलिसांना आला नाही. त्यामुळे या मेगाब्लॉकचे खापर पोलिसांवर फोडत वाहनधारकांनी आपला संतप व्यक्त केला. दररोज टोलनाक्‍यावर एका बाजुला महामार्ग पोलिस तर दुसऱ्या बाजूला भुईंज पोलिस ठाण्याचे कर्मचारी दिसतात. दररोज दंडात्मक कारवाई करून आपले टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात पोलिसांना रविवारी वाहतूक कोंडी फोडण्यात अपयश आले. सरते शेवटी वाहनधारकांनीच वाहतूक कोंडी फोडत आपला प्रवास सुखकर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)