आनाड कुटुंबावर काळाचा घाला

एकाच कुटुंबातील सहा जणांचा अपघातात मृत्यू ः येवला-मनमाड महामार्गावरील अनकाईबारी येथील घटना
कोपरगाव – येवला-मनमाड महामार्गावरील अनकाई बारीजवळ कार व टेंपोच्या अपघातात कोपरगाव येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात एका पाच वर्षांच्या चिमुरड्यासह तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. हा अपघात आज (दि. 21) पहाटे पाचच्या सुमारास झाला. या घटनेनंतर कोपरगाव शहरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे पाचच्या सुमारास हरियाना येथील टेम्पो (क्र. एचआर-45- हा येवल्याकडून मनमाडच्या दिशेने जात होता. हा टेम्पो मनमाड-येवला रस्त्यावरील अनकाईबारी येथे आला असता मनमाडकडून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची (क्र. एमएच-17 बीएल-1881) धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सहा जणांचा जागेवर मृत्यू झाला. मृतांना वाहनांतून काढताना जेसीबी मशिनचा आधार घ्यावा लागला.
अपघातात कोपरगाव येथील बाबा पान स्टॉलचे संचालक बाळासाहेब मुरलीधर आनाड (वय 60), इंदुबाई बाळासाहेब अनाड (वय 55), श्रीनाथ बाळासाहेब आनाड (वय 25, सर्व रा. शारदानगर, कोपरगाव), मोहिनी गणेश खांदवे (वय 35), हरी गणेश खांदवे (वय 5, दोघे रा. तेलीखुंट, अहमदनगर), भीमाबाई बापू रोकले (वय 70, रा. इंदोर), अशी मृतांची नावे आहेत.
कोपरगाव येथील आनाड कुटुंबीय इंदूर (मध्यप्रदेश) येथील नातेवाईकांकडे गेले होते. यात बाळासाहेब आनाड यांची पत्नी, मुलगा, मुलगी, नातू व बहीण यांचा समावेश होता. हे सर्व नातेवाईकांना भेटून कोपरगावला परतत होते. येवला येथे काळाने या कुटुंबावर घाला घातला. अपघातातनंतर मृतदेह येवला येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून, तेथे मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)