आनंद स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

चिंबळी- कुरुळी (ता. खेड) येथील आनंद इंग्लिश मीडियम स्कुलचे 12वे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले, अशी माहिती स्कुलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल काळे यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे कलगुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली नृत्य, गायन व नाटक यांचे दिग्दर्शन शिक्षकांनी केले. विद्यार्थ्यांनी “पौष्टीक खाद्य पदार्थांवर तसेच मोबाईल वापरामुळे होणारे दुष्परिणाम’ यावर सुंदर नाटक सादर केले गतवर्षी परीक्षेत व स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पाटकवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शालेय उपक्रमांमध्ये मिळालेल्या परितोषिकांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. तर याप्रसंगी डॉ. गजानन मकीकर, शाळेचे संस्थापक डॉ. अनिल काळ, विनोदी कलाकार बंडा जोशी, मराठी बालकलाकार आर्या घारे यांची उपस्थिती अवर्णनीय ठरली. स्नेहसंमेलनाचे उत्कृष्ट सजावट शाळेच्या कालाशिक्षिका लाभश्री काशीकर यांच्यासह सर्व शिक्षकरवृदांनी केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरला सोनवणे, सूत्रसंचालन शीतल यादव, जागृती खंडागळे तर अनुपमा कदम यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)