आनंद दिघे स्कूलचे आज स्नेहसंमेलन

अकोले – धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल, वीरगाव (ता. अकोले) वार्षिक स्नेहसंमेलन बुधवारी (दि.31) सायंकाळी 6 वाजता होणार आहे, अशी माहिती प्राचार्य किरण चौधरी यांनी दिली. कार्यक्रमाचे उद्‌घाटन आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते होणार आहे. राजूर प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वास आरोटे, अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष डी. के. वैद्य, रोटरी क्‍लब तालुकाध्यक्ष अमोल वैद्य, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, विस्ताराधिकारी बाळासाहेब दोरगे, गोरक्ष मालुंजकर, भाऊ पाटील नवले, खडके महाराज, जगन देशमुख, रामनाथ वाकचौरे, बाबासाहेब वाकचौरे, आबासाहेब देशमुख, शरद वाकचौरे, संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सचिव अनिल रहाणे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत. पालक व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कॅम्पस डायरेक्‍टर लक्ष्मण ढोन्नर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)