आनंद इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे फराळ वाटप

चिंबळी- आनंद मेडिकल फाउंडेशन संचलित आनंद इंग्लिश मीडियम स्कुलच्या (कुरुळी) वतीने ठाकूर पिंपरी, राजगुरूनगर येथील निर्मल बाल विकास संस्था (अनाथाश्रम) ला भेट देऊन दिवाळीचे फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल काळे, संस्थेच्या सचिव अनघा काळे, स्कुलच्या मुख्याध्यापिका सरला रेवगडे (सोनवणे), नर्सिंग इन्स्टिट्युटच्या प्रिन्सिपल लुशा, असे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेच्या माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सारिका गवारे, स्नेहल बागडे, माया मुऱ्हे, रंजिता मुऱ्हे, ज्योती मुऱ्हे, अनिता कड, हेमलता कड, प्रकाश मुऱ्हे (उपाध्यक्ष, शालेय समिती, आनंद इंग्लिश मीडियम स्कुल) हे उपस्थित होते, यावेळी आश्रमाच्या प्रमुख गीता यांच्यासोबत हितगुज करून या सर्वांनी समस्या समजून घेतल्या.यावेळी चर्चेत असे लक्षात आले की, आश्रमाचे वीज बिल थकल्यामुळे विजेची सुविधा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे डॉ. काळे यांनी त्याक्षणी त्वरित 5551 रुपयांचा धनादेश गीता यांना सुपूर्द केला व आरोग्य सेवेच्या बाबतीत मुलांची विनामूल्य तपासणी करण्याचे आश्वासन दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)