आनंदी जीवनासाठी चतु:सूत्रीच अवलंब करा

राजगुरूनगर- आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करणे, स्नेहभाव जपणे, दानशूरवृत्ती वाढविणे आणि नियमित व्यायाम करणे या चतु:सूत्रीचा अवलंब करायला हवा, असे प्रतिपादन प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. धम्मपाल भामरे यांनी येथे केले.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती आणि विस्तारणारी क्षितिजे या विषयावर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना डॉ. भामरे बोलत होते. यावेळी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष प्रताप टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक डॉ. अनिल खिवंसरा, ऍड. मुकुंद आवटे, बाळासाहेब सांडभोर, ऍड. माणिक पाटोळे, अंकुश कोळेकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे, प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ. संजय शिंदे यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. धम्मपाल भामरे म्हणाले की, योगा ही भारताने विश्वाला दिलेली देणगी असून त्या ज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात करा. कोणत्याही दुखन्याकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांनी विचार बदलले की नशीब बदलेन. कारण विचार हे शरीर व मनावर परिणाम करीत असतात. स्वतःच्या गुणांवर विश्‍वास ठेवा. स्वतःची क्षमता विकसित करा, वर्तमानात जगा, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, प्रवास करा, खिलाडूपणाने जीवन जगा आणि शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी आयुर्वेदाचार्य डॉ. नीला भामरे यांनी ध्यानधारणेचे मानवी जीवनातील महत्त्व सांगून विद्यार्थ्यांकडून ध्यानधारणा कशी करायची याचे प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. बी. दौडकर, पाहुण्यांचा परिचय डॉ. के. बी. सोनवणे यांनी केला तर मयुरी सैद हिने आभार मानले.

  • शिवाजी महाराजांचे “ते’ विषय जगाच्या अभ्यासाचे ठरले
    छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रयतेचे राज्य निर्माण करताना अर्थव्यवस्था, युद्धनीती, कृषिव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, दुष्काळाचे नियोजन, तत्पर प्रशासन, आरमार उभारणी अशा विविध क्षेत्रात केलेले कार्य जगाच्या अभ्यासाचा विषय ठरले असून ते खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते असे गौरवोद्गार इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी काढले. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना “श्री शिवछत्रपती : युगप्रवर्तक राजे’ या विषयावर कोकटे बोलत होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)