आनंदी जीवनासाठी संत विचारांचे आचरण हवे!

कार्यक्रमास उपस्थित महिला वर्ग

गणेश शिंदे यांचे मत : “महावीरांचे तत्वज्ञान’ विषयावर व्याख्यान

पिंपरी – आनंदी जीवन जगण्यासाठी संपत्तीची नाही, तर संत विचारांच्या आचरणाची गरज आहे. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी आनंदी जीवन जगण्यासाठी अहिंसेचे तत्वज्ञान जगाला दिले. जगाने आता महावीरांचे तत्वज्ञान स्वीकारायचे की, महाविनाश स्वीकारायचा याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे मत युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्‍त केले.

भगवान महावीर जयंती निमित्त आकुर्डी, निगडी प्राधिकरणातील श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्या वतीने गुरुवारी, आकुर्डी येथे शिंदे यांचे “भगवान महावीरांचे तत्वज्ञान व सध्यपरिस्थिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी संघाचे अध्यक्ष संतोष कर्नावट, महामंत्री मनोज सोळंकी, राजेंद्र खिंवसरा, प्रकाश मुनोत, जयकुमार चोरडीया, सुभाष ललवाणी, राजेंद्र मुनोत, पुनम कर्नावट, अनिता सोळंकी आदींसह बहुसंख्य जैन समाज बंधू भगिनी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी आपल्या एैश्वर्याचा त्याग करुन बुध्दीप्रामाण्यवाद स्वीकारुन सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने सम्यकदर्शकन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य शिकवले. सुख हे भौतिक गाष्टींशी संबंधित नसून, ते आत्म्याशी संबंधित आहे. संपत्ती संचय करणारे झोपण्यासाठी लाखो रुपयांचे फर्निचर, बेड करतात. फकीराचे जीवन जगणा-या साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुगूट, सिंहासन अर्पण करुन झोप येण्यासाठी नवस करतात. परंतु, त्यांचे स्वास्थ बिघडल्यामुळे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने चटईवर झोपावे लागते.

आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली व्हॉटसअप, फेसबुकच्या आभासी दुनियेत रमणारे “मम्मी – पप्पा’ पुढच्या पिढीवर काय संस्कार करणार? उद्याच्या चिंतेपायी माणूस संपत्ती संचयाच्या मागे धावत आहे. या धावण्यामुळे माणूस म्हणून जीवन जगण्याचा खरा आनंद केव्हा गमावून बसला हे कळलेच नाही. आता मानसांतील संवेदनशीलता जोपर्यंत जागी होत नाही. तोपर्यंत जगण्याचा खरा आनंद मिळणार नाही, असेही शिंदे म्हणाले. दुपारी औंध जिल्हा रक्तपेढी समवेत रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी जैन बंधू भगिनींनी उर्त्स्फुतपणे सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)