अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
सांगवी – माणूस रडण्यासाठी जन्माला आलेला नाही, तर पक्षांप्रमाणे स्वच्छंदपणे उडत संकटावर मात करण्यासाठी त्याचा जन्म झालेला आहे. त्यामुळे माणसाने कुढत जगण्यापेक्षा स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन शिव कीर्तनकार प्रा. डॉ. गजानन महाराज वाव्हळ यांनी केले. मराठवाडा जन विकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार हे समाजासाठी, मुक्‍या प्राण्यांसाठी देवमाणूस आहे. सामाजिक बांधिलकीचे भान असणारे, अध्यात्माची गोडी असणारे सत्वशील व्यक्‍तीमत्व आहे, असेही डॉ. वाव्हळ यांनी सांगितले.

मराठवाडा जन विकास संघ संचालित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. डॉ. गजानन वाव्हळ यांच्या वाढदिवसानिमित्त “एक अनोखी शब्द मैफिल : आनंदाचे डोही’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना 500 तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. पिंपळे गुरवमधील विठ्ठल भजनी मंडळ, जोगेश्वरी भजनी मंडळ, साधना भजनी मंडळ, भीमाशंकर भजनी मंडळ यांना टाळ, मृदंग, वीणा, तबला, पेटी आदी भजनी साहित्य भेट देण्यात आले. आदिवासी भागातील गरजू गुणवंत विद्यार्थी समर्थ रामचंद्र पानसरे याला शैक्षणिक आर्थिक मदत व सन्मान चिन्ह देण्यात आले. रंगोत्सव सेलिब्रेशन ऑर्गनायझेशन फॉर नॅशनल लेवलमध्ये सुवर्ण पदक विजेती त्रिशा बंडेवार हिचा सत्कार करण्यात आला. एक हजार कि. मी. मनाली ते लेह-लडाख सायकल प्रवास यशस्वीरित्या पार केल्याबद्दल साईदीप धोंडगे यांचा सन्मान करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप, ह.भ.प. विश्वनाथ वाखारे, ह.भ.प. तुकारामभाऊ महाराज, ह.भ.प. तांदळे महाराज, समाज प्रबोधनकार शारदा मुंडे, पोलीस पाटील जयसिंग पाटील, विजू जगताप, नगरसेविका माई ढोरे, उषा मुंढे, सविता खुळे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, माजी नगरसेवक शंकर जगताप, नगरसेवक नाना काटे, संतोष कांबळे, हर्षल ढोरे, सागर आंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, स्वीकृत सदस्य नगरसेवक गोपाळ मळेकर, उद्योजक बालाजी पवार, बिभीषण चौधरी, विनोद तापकीर, सामाजिक कार्यकर्ते श्‍याम जगताप, अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, बाळासाहेब जवळकर, संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य आदिती निकम, उद्योजक सतीश काशीद, मनिष कुलकर्णी, माधव मनोरे, संतोष जगताप आदी उपस्थित होते. दत्तात्रय धोंडगे, वामन भरगांडे यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत कुरूलकर यांनी आभार मानले.

मरकळ येथे केशवराज विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी व ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, सुभाष घेणंद, राजाराम लोखंडे, भगवान लोखंडे, बाजीराव लोखंडे, लालाअण्णा माळी, सागर लोखंडे, शंकर सुतार, प्राचार्य उत्तम जाधव, हरित सेना सदस्य आर. टी. लाटे उपस्थित होते. वडगाव शिंदे येथील आबासाहेब गोसावी माध्यमिक विद्यालयात 350 विद्यार्थी-विद्यार्थीनींना वह्या, कंपास पेटी आणि इतर शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली आणि संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडीक आणि रिहॅबिलिटेशन पुणे यांनी आरोग्य शिबीर घेतले. हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, सरपंच विजय शिंदे, उपसरपंच सुकेशिनी गायकवाड, विलास शिंदे, भरत काकडे, मुख्याध्यपक कल्याण बरडे, मुख्याध्यापिका ज्योती माने, तंटामुक्‍ती अध्यक्ष राम काकडे आदी उपस्थित होते. सुमारे चारशे ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ममता अंध-अनाथ केंद्रात उद्योजक सोमनाथ भोसले यांनी धान्य, फळे आणि रोज लागणाऱ्या गरजू वस्तूंचे वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)