आनंदवाडीच्या पाऊसग्रस्तांना चादरीचे मोफत वाटप

मुंबईच्या साईउत्सव पालखीचा मदतीचा हात
कोपरगाव – तालुक्‍यात चांदेकसारे भागातील आनंदवाडी येथे पावसामुळे घरांचे नुकसान झाले. अनेक जनावरेही वाहून गेली. मदतीच्या उद्देशाने मुंबईतील साईउत्सव मित्रमंडळाच्या साई पालखीने येथील कुटुंबियांना चादरीचे मोफत वाटप केले.
आनंदवाडी येथे 21 जून रोजी अतिवृष्टी झाली होती. या पाण्यात बऱ्याच घरांचे नुकसान झाले होते. मोठ्या संख्येने जनावरेही त्यात वाहून गेली होती. तालुक्‍यात पोहेगाव मंडळात 21 जूनला 73 मिलीमिटर पाऊस झाला होता. यामुळे आनंदवाडी येथील काही घरांची पडझड झाली होती. 250 घरांत पाणी शिरले होते.
संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने आपत्ती निवारण पथकाने 54 रहिवाशांची सुटका केली होती. मुंबई परिसरातील चिकणघर येथील साई उत्सव मित्र मंडळाची साईपालखी गेल्या 24 वर्षांपासून शिर्डीस येत असते. पालखीतील साईभक्‍तांची व्यवस्था चांदेकसारे येथील रहिवासी करतात. आनंदवाडीतील रहिवासी अडचणीत सापडले. त्यांना मदतीचा हात देण्याच्या भावनेतून पालखीचे कार्याध्यक्ष शालीक भोईर, अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष अल्पेश भोईर, सचिव नंदू पाटील खजिनदार शरद केने व त्यांच्या सहकाऱ्यांनी 250 चादरींचे वाटप केले. याबद्दल सरपंच पूनम खरात व उपसरपंच अशोक होन यांनी मंडळाचे आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)