आनंदवन प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

कोळकी, दि. 1 (वार्ताहर) – आनंदवन प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुद्र निपाने हा विध्यार्थी होता. दुर्गेश इंगळे, साहिल काळुखे हे विध्यार्थी वेशभूषा परिधान करून उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तेजश्री जाधव, मनीषा निपाणे, मुख्याध्यापिका सौ. स्वाती फुले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनुलेखन, शुध्दलेखन, निबंधलेखन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)