आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या ओंड शाखेचा वर्धापनदिन उत्साहात

ढेबेवाडी – आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या ओंड ता. कराड येथील शाखेचा 17 वा वधार्पनदिन व शाखेत मिनी एटीएमचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थापक हिंदूराव पाटील, चेअरमन अभिजित पाटील, शाखा सल्लागार धोंडीराम पाटील, संचालक प्रवीण पाटील, सुरेश मोहीते, सुनिल शिंदे, तात्यासो थोरात, रघुनाथ थोरात, गोरख पाटील, पी. बी. शिंदे, राजीव थोरात, दिग्विजय थोरात, शंकर ससे, मोहनराव थोरात, व्यवस्थापक सुहासचंद्र पाटील उपस्थित होते. अभिजित पाटील म्हणाले, ओंड शाखेने सुरूवातीपासूनच गरूडझेप घेवून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

बॅकिंग क्षेत्रात काम करताना शासनाच्या नवनवीन धोरणांची अंमलबजावणी केली आहे. सहकारात पारदर्शकता व ग्राहकांचा विश्वास महत्वाचा आहे. हेच धोरण आनंदराव चव्हाण पतसंस्थेने जोपासल्याने सर्व शाखा प्रगतीपथावर आहेत. संस्थने मिनी ए.टी.एम. सुविधा सुरू करून सहकारात एक पाऊल पुढे टाकले आहे. धोंडीराम पाटील म्हणाले, आनंदराव चव्हाण पतसंस्था ओंड परिसरातील सर्वसामान्य लोकांची अर्थवाहिनी बनली आहे. या संस्थेमुळे लोकांच्या अडचणी सुटत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात संस्थेचा नावलौकिक वाढणार आहे. स्वागत सुहासचंद्र पाटील यांनी केले तर रामचंद्र शिंदे यांनी आभार मानले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)