“आनंद’मध्ये कवायतींद्वारे क्रांतीकारकांना अभिवान

चिंबळी- कुरुळी (ता. खेड) येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. आनंद फाउंडेशन नर्सिंग महाविद्यालय व आनंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायतींद्वारे क्रांतीकारकांना अभिवादन केले. त्यानंतर शाळेच्या मैदानात शाळेचे अध्यक्ष गजानन मंकीकर, संस्थापक अनिल काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यात साधन कवायत, योगासने, मानवी मनोरे, लेझीम, व ध्वजगीतांवर नृत्य अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळा पार पडला. शाळेच्या अध्यक्षांनी या मोलाच्या दिवशी विजेत्या मुलांना व उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सरला सोनवणे यांच्यासह शिक्षक वृदांनी केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)