आधुनिक शेती तंत्रज्ञान विकासाची गरज – जगधने

 शिवाजी विद्यालयात फाली अभ्यासक्रम शुभारंभ
 शाळेबरोबर शेतीचेशिक्षणही काळानुसार गरजेचे

शिरसगाव- सध्या आधुनिक शेती तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन रयत मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीना जगधने यांनी केले. श्रीरामपूर तालुक्‍यातील वडाळा महादेव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात फ्युचर ऍग्रीकल्चर लीडर्सऑफ इंडिया अभ्यासक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.

जगधनेम्हणाल्या, नगर जिल्ह्यात वडाळा महादेव, कर्जत, श्रीगोंदा या तीनच ठिकाणी हा अभ्यासक्रम सुरु आहे. शालेय शिक्षण घेत असताना शेतीचेही शिक्षण आवश्‍यक आहे. उत्कृष्ट शेतकरी बनण्याची यातून संधी आहे. काकोडकर, माशेलकर, हनुमंत गायकवाड या शास्त्रज्ञानांही आपल्या संस्थेत सामावून घेतलेआहे. त्यांचा आपल्याला फार फायदा होणार आहे. ग्रामस्थांचाही यात सहभाग असल्याने विद्यालय प्रगतीकडे वाटचाल करत आहे.

प्राचार्यभोर, गुलाब पवार, सुधीर कासार, सी. वाय. पवार, धनंजय पवार, सरपंच प्रमिला राठोड, सुनील कुदळे, रघुनाथ उघडे, माणिक पवार, रामभाऊ कासार, बाळासाहेब कासार, अनिल पवार, विजय राठोड, रफिकशेख, संजय राठोड, मुख्याध्यापक एस. के. मरभळ, इनामके, नगरे, वाव्हळ, चोखर, थेटे, बोरावके, कुऱ्हाडे, निकाळे, थोरात, पवार, बांडे, राजेंद्र देसाई, मनोहर तुळसेयावेळी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)