आधुनिक शेती अवजारांचा वापर करावा- पवळे

पिरंगुट- शेतीतील कामासाठी मजुरांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असून तो शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर जात आहे. पैसे खर्च करूनही मजूर वेळेवर उपलब्ध होत नाहीत. अशा काळात शेतकऱ्यांनी शेतीतील मशागत, पीक लागवड, पीक काढणी यासारखी कामे बाजारात उपलब्ध होत असलेल्या आधुनिक व स्वस्तातल्या शेती अवजारांचा वापर करून सुलभ पद्धतीने केली पाहिजेत, असे मत पिरंगुटचे माजी सरपंच ज्ञानेश्‍वर पवळे यांनी व्यक्‍त केले. पिरंगुट येथे उदय फॅब्रिकेटर्समध्ये भूषण मिस्तरी या वेल्डर विषयाचे तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणाने तयार केलेल्या विजेवर चालणाऱ्या भातझोडणी यंत्राच्या पूजन व प्रात्यक्षिकप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पिरंगुटच्या सरपंच सुप्रिया धोत्रे, उपसरपंच दिलीप पवळे, पोलीस पाटील प्रकाश पवळे, माजी सरपंच ललीता पवळे, पोलीस पाटील स्वाती गोळे कासारअंबोली पोलीस पाटील स्वाती सुतार, माजी उपसरपंच वैभव पवळे, अंकुश नलावडे, चांगदेव निकटे, पिरंगुट व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राहुल पवळे, उद्योजक संतोष राजाराम पवळे, विशाल धोत्रे, आदर्श शेतकरी संतोष नथू पवळे,बापू पवळे,सचिन पवळे, चंद्रकांत चोरघे, संतोष पवळे, रोहन निकटे आदी उपस्थित होते.
पिरंगुटच्या सरपंच सुप्रिया धोत्रे, प्रकाश पवळे यांच्या हस्ते भाताची पहिली पेंढी लावून या भात झोडणी यंत्राचे पूजन करण्यात आले. भूषण मिस्तरी यांनी भात झोडणी करून यंत्राविषयी प्रात्यक्षिक व माहिती दिली. दिवसभरात केवळ दोन मजुरांच्या मदतीने 35 ते 40 पोती भात झोडणी करण्याची क्षमता असल्याने शेतकऱ्यांची मोठी सोय होणार असल्याने या प्रयोगाबद्दल भूषण यांचे सर्वांनी कौतुक केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)