आधुनिक महाराष्ट्रासाठी सहकाराची स्थापना

आ. बाळासाहेब पाटील; कांबीरवाडी येथे नवनिर्वाचीत सरपंच व सदस्यांचा सत्कार

मसूर – महात्मा फुले, शाहु, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र हा आधुनिक झाला पाहीजे. यासाठी स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांनी सहकाराची स्थापना करुन ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय योजना ग्रामीण विकासासाठी निर्माण केल्या, असे उद्‌गार आमदार बाळासाहेब पाटील यांनी काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कांबीरवाडी, ता. कराड येथे सलग तीन वेळा ग्रामस्थांनी एकोप्याने ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करुन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्याबद्दल नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा व प्राथमिक शाळा संरक्षक भिंत, डिझीटल क्‍लासरुम व साकव पूलाचे उद्‌घाटन असा संयुक्‍त कार्यक्रम आ. बाळासाहेब पाटील यांचे शुभहस्ते व जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

आ. पाटील म्हणाले, कांबीरवाडी ग्रामस्थांनी तीन वेळा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. विकासासाठी एकसंघपणाची गरज कायम ठेवावी. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून कॅनॉलला पाणी सोडल्यानंतरच खऱ्या अर्थाने विकासाला गती आली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी सह्याद्रि कारखान्याची निर्मिती करुन सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करण्यासाठी संधी निर्माण केली आहे.

प्राथमिक शाळेत डिजीटल शाळेमुळे हसत खेळत शिक्षणाचा फायदा मुलांसाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यास मदत होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामे करण्यास संधी प्राप्त झाली आहे. अलीकडच्या काळात निवडणुकीपुरते येणाऱ्या व लोकांच्या भावनेशी खेळणाऱ्या लोकांपासून दूर रहा भूलथापा मारुन सरकार सर्वसामान्यांनी थट्टा करीत आहे. कोणताही निर्णय घ्यायचा नाही. व खोटी आश्‍वासने देवून लोकांची दिशाभुल करण्याचे काम सुरु आहे. तरी सुध्दा विकास कामांसाठी सदैव पाठपुरावा सुरु ठेवून निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. विकासाचा भगीरथ असाच पुढे नेण्यासाठी आदरणीय शरद पवारसाहेबांच्या विचाराने राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असेही आवाहन त्यांनी केले.

मानसिंगराव जगदाळे म्हणाले, आ. बाळासाहेब पाटील यांचे माध्यमातून ग्रामीण विकासाची जास्तीत-जास्त कामे होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. यावेळी नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांचा आ. बाळासाहेब पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन बाळासो सावंत यांनी केले. रमेश चव्हाण यांनी केले. आभार जगन्नाथ कांबीरे यांनी मानले.

कार्यक्रमास सह्याद्रि कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे, लहूराज जाधव, माजी पं. स. सभापती शालन माळी, पं. स. सदस्य रमेश चव्हाण, सरपंच महेंद्र बोले, उपसरपंच जगन्नाथ कांबिरे, राकेश माने, प्रियांका कांबिरे, विद्या कांबिरे, रुक्‍मिणी कांबिरे, ठेकेदार सुहास पिसाळ, प्रकाश माळी, कादर पिरजादे, शहाजीराव जगदाळे, आनंदराव चव्हाण, नरेश माने, प्रभाकर यादव, प्रकाश कांबिरे, प्रताप कांबिरे, सुभाष कांबिरे, दिपक कचरे, दादासो पोकळे, बाजीराव पडळकर, भाऊसाहेब चव्हाण, बाळासो जगदाळे, महिपती चव्हाण, आण्णासो शिरतोडे, तानाजीराव पार्लेकर, मधुकर चव्हाण, राजकुमार चव्हाण, उदय चव्हाण, मधुकर धस, बापूसो इंगळे, रामकृष्ण कांबिरे, पोपट कांबिरे, रामचंद्र सावंत, बाबा माने, तानाजी कचरे, युवक मंडळ, ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)