आधुनिक तंत्रज्ञानाने खोडवा ऊसाचे उत्पादन घेणे शक्‍य : अरुण देशमुख

मसूर – लागणीचा ऊस तुटून गेल्यावर पाचट न पेटवता रिकाम्या सरीत आच्छादन करुन तुटलेल्या ऊसाचे खोड जमिनीलगत छाटून, पाणी, रासायनिक खते, सेंद्रिय खत व जिवाणू खते यांचा काटेकोर व प्रमाणशीर वापर करावा. आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यास खोडवा ऊसाचे उत्पादन लागणीच्या उत्पादनापेक्षा जास्त घेणे सहज शक्‍य होते, असे मत नेटाफिम इरिगेशन इंडियाचे मुख्य शेती तज्ञ अरुण देशमुख यांनी व्यक्‍त केले.

खोडवा ऊस पिकाबाबत सह्याद्रि साखर कारखान्यावर आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कारखान्याचे संचालक डी. बी. जाधव, संजय जगदाळे, पै. संजय थोरात, सोमनाथ जाधव, आबासाहेब पाटील, शेती अधिकारी मोहनराव पाटील, विश्‍वासराव शेलार, वसंतराव चव्हाण, डी. एन. पिसाळ, ऊस विकास अधिकारी संजय चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी नितीन साळुंखे उपस्थित होते.

अरुण देशमुख म्हणाले, खोडवा हे बोनस पीक असताना शेतकरी त्यावर फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे उत्पादन कमी येते. लागण करताना ऊसाची एकरी संख्या योग्य प्रमाणात ठेवल्यास खोडवा पीक चांगले येते. ऊसाची लागण तुटल्यानंतर खोडवा ठेवताना घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक मोहनराव पाटील यांनी केले. ऊस विकास अधिकारी व्ही. बी. चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले. शेतकरी मेळाव्यास नेटाफिम इरिगेशनचे अधिकृत डिलर युवराज भाईटे, केदार मुळे, हिंगमिरे, सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी ऊस उत्पादक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)