आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी

नांदूर- येथील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न घेऊन देशाचा उत्कर्ष साधावा, असे आवाहन कृषीकन्यांनी नांदूर गावांतील शेतकऱ्यांना केले.
कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे येथील 7 कृषीकन्या ग्रामीण भागात शेती कशी केली जाते? याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी संस्था आणि शिकांच्या मार्गदशनाखाली नांदूर (ता. दौंड) या गावात आलेल्या आहेत. येत्या चार महिन्यात त्या शेतीचा अनुभव घेत असताना येथील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, याबाबत मार्गदशन करणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे येथे बीएस्सी अग्री चतुर्थ वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या सुरेख दराडे, हर्षदा भदाणे, सुप्रिया वाकळे, कांचन पाचकय, आश्विनी तायडे, मोहिनी सागर आणि लता मुंडे या कृषीकन्या नांदूर गावामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव या विषयाअंतर्गत अभ्यास करण्यासाठी चार महिने गावात रहाणार आहेत.
या कालावधीत त्या प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांचे अनुभव घेणार असून याचबरोबर त्यांनी महाविद्यालयात आधुनिक शेतीविषयी घेतलेले शिक्षणाविषयीचे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. तसेच मातीपरीक्षण करून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेती करून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न कसे घ्यावे? याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. नांदूर गावातील नागरिकांनी या कृषीकन्यांचे स्वागत केले. दौंड पंचायत समिती उपसभापती सुशांत दरेकर, उद्योजक आणि प्रगतीशील शेतकरी भानुदास बोराटे, विकास बोराटे, अमोल बोराटे, मयुर घुले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)