नवी दिल्ली – राफेल विमान करारावरून काँग्रेससहित सर्व विरोधी पक्ष सध्या मोदी सरकारला घेरत आहेत. या करारावरून मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात येत आहे. अशातच पहिल्यांदाच राफेल कराराविषयी भारतीय हवाई दलाकडून अधिकृतपणे मत मांडण्यात आले आहे.

राफेल करारावर हवाई दल प्रमुख एयरचीफ मार्शल बीएस धनोआ यांनी मोदी सरकारचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, सध्या भारत अवघड परिस्थितून वाटचाल करत आहेत. आपल्या शेजारील राष्ट्र अण्वस्त्र संपन्न असून ते काही स्वस्थ बसलेले नाही. ते एका रात्रीतही हल्ला चढवू शकतात. शिवाय चीन, पाकिस्तान सातत्याने आपली शस्त्रांचे आधुनिकीकरण करत आहेत. अशामध्ये भारतीय दलाला राफेलसारख्या विमानांची गरज आहे. भारतीय हवाई दलाची ताकद वाढविण्यासाठी केंद्र सरकारकारकडून राफेल युद्ध विमाने आणि एस-४०० मिसाईल खरेदी करण्यात येत आहेत. राफेल विमानांद्वारे भारत युद्ध स्थितीचा सामना करू शकेल, असेही त्यांनी सांगतिले आहे.

दरम्यान, हवाई दलाचे चीफ एअर मार्शल एसीबी देव यांनीही काही दिवसांपूर्वीच राफेल कराराचे समर्थन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)