आधुनिकीकरणाअभावी माण बाजार समितीची मान खाली

बिदाल -महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र माण तालुक्‍यातील बाजार समितीने आधुनिक संवाद माध्यमांकडे पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांच्या विकासाठी कोणतेही ऍप्स, वेबसाइट, फेसबुक पेज, व्हॉटस्‌ऍप ग्रुप तयार केली नाहीत. त्यामुळे बारामती, फलटण, कराड, सातारा इतर तालुक्‍यांच्या तुलनेत मागे आहे.

माण तालुक्‍यात दहिवडी, कुकुवाड, मलवडी, म्हसवड, वावहिरे, मार्डी, बिदाल, बिजवडी, शिखर, शिंगणापूर, गोंदवले या गावामध्ये बाजार मोठ्या प्रमाणत भरतो. बाजार पेठांमध्ये मालाची आवक -जावक कमी आधिक प्रमाणत होत असल्यामुळे शहरी व खेड्यात व्यापार करत असलेल्या शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. काही वेळेस त्यांची फसवणूक होताना दिसते. सध्या तालुक्‍यात व्हाट्‌सऍपवर राजकीय बातम्या तसेच अनेक गोष्टीची देवाण-घेवाण केली जाते. मात्र बाजारभाव, हवामान अंदाज, शेतीविषयक सरकारी योजना, आधुनिक शेतीची माहितीची शेतकऱ्यांना होत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यात डाळींब, कांदा या दोन पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणत घेतले जाते. मात्र बाजारभाव, हवामान अंदाज यामध्ये सतत बदल होत असल्यामुळे योग्य तो मोबदला मिळत नाही. बाजार समितीने शेतकऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवनू जर व्हॉटसऍपग्रुप, फेसबुकपेज, वेबसाइट, ऍप्स तयार केले तर शेतकऱ्यांना बाजारभाव, हमीभाव, शेतीविषयक माहिती, सरकारी योजना आदी माहिती होऊ शकते. बाजाराच्या वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अशा तंत्रज्ञानाचा वापर घेणे गरजेचे आहे. बाजार समितीने लवकरच अशी सेवा उपलब्ध करुन द्यावी अशीतालुक्‍यातील शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)