आधुनिकतेमुळे वैदू समाजाच्या व्यवसायाला घरघर

निमसाखर- वैदू समाज म्हटले की दारोदार भटकंती करून सुया बीब दाबून महिलांच्या विविध सौंदर्य साधने विक्री घरोघरी जाऊन केले जात असत. त्याच्या मोबदल्यात भाकरी, धान्य पैसे घेऊन कुटुंबाचे पालन पोषण करत. तर पुरूष पत्र्यापासून डब्बा, चाळणी, टोपल्याला बुड बसवणे असा व्यवसाय करीत असत. आधुनिकीकरणाचा फटका या वैदू समाजाच्या व्यवसायावर बसला आहे. बाजारात सहजासहजी हव्या त्या वस्तू मिळत असल्याने वैदू समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शेळगांव येथील मोतीराम गोविंद शिंदे हे वयाच्या 10 वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत चाळण्या, डब्बा, सुपली बनवण्याचा वडिलोपार्जित धंदा जोपासला आहे. तरी कोणीही वस्तू खरेदी करीत नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मोतीराम शिंदे हे वडिलोपार्जित डब्बा, चाळणी, सुपली, संदूक, टोपलीला बुड बसवण्याचा व्यवसाय गेल्या 50 वर्षापासून जोपासला आहे.
शेळगांव येथील मोतीराम गोविंद शिंदे हे वयाच्या 10 वर्षांपासून आपल्या वडिलासोबत गावोगाव भटकत व्यवसायाची गोडी निर्माण झाल्याने वडिलोपार्जित धंदा स्वीकारला आहे. 50 वर्षांपासून हा धंदा शिंदे करीत आहेत. परंतु 1984 सालापासून या धंद्याकडे हळूहळू पाठ फिरवून बाजारात चांगले दर्जाचे वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहक वळले आहेत. 1990 सालापासून या धंद्याला घरघर लागली आहे. आज प्रत्येकाच्या घरोघर व्यवसाय जोपासना करण्यात आलेले दुर्मीळ झाले आहेत. दिवसातून एखादी वस्तू बनवून घेतली जाते. त्यावरच उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. शासनाने वैदू समाजाला शासकीय सुविधा उपलब्ध करून दिल्यास धंद्यावर व कुटुंबावर आलेल्या उपासमारीच्या वेळेवर मात करता येईल, अशी व्यथा मोतीराम शिंदे मांडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)