आधी मोबदला द्या; मग भू-संपादन करा !

file photo

सांगवी – पिंपळे-गुरव येथील तुळजा भवानी मंदिर ते सृष्टी चौक रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. दि. 1 डिसेंबरला पिंपरी-िंचंचवड महापालिकेने येथील बाधितांना नोटीस देऊन 24 तासांत बांधकाम काढून टाकावे, असा आदेश दिला. परंतु सरकारी नियमानुसार बाधितांना मोबादला द्यावा आणि मगच भू-संपादन करावे, अशी मागणी पिंपळे-गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदीयाल यांनी केली आहे. जागा ताब्यात घेण्याआधी सरकारी नकाशाप्रमाणे मोजमाप करुन हद्द, क्षेत्रफळ सांगावे. भू-संपादन प्रक्रियेस सर्व बाधितांचे सहकार्य राहील, असे आश्‍वासनही निवेदनात दिले आहे. केवळ सिमेंट रस्ता होत आहे म्हणून डीपीप्रमाणे रस्ता करू नये. कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम डीपी रस्त्यातून पाडले तर संबंधीत जागा मालकांना भू-संपादन करण्यासाठी खासगी वाटाघाटी करण्यासाठी किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या भू-संपादन प्रक्रियेनुसार रस्त्यासाठी लागणारी जागा ताब्यात घेणे जरूरी आहे. यासाठीच अर्जदार व इतर रस्ता बाधित जागा मालक प्रशासनास सहकार्य करण्यास तयार आहेत, त्यामुळे कोणाच्या तरी दबावापोटी एमआरपीपी मधील नियमांना डावलू नये व कोणत्याही अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कामकाज करू नये, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)