आधी मी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्या : आ. शंभूराज देसाई

आयोध्येला का गेलो नाही, हे विचारण्याचा आधिकार पक्षप्रमुखांना
आमच्या पक्षप्रमुखांनीच मतदार संघात थांबून महाआरती करा, असा आदेश दिला असेल तर तुमच्यासारखे येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, अशी मागेमागे लागून जायची सवय मला नाही. आमचे नेते मला बोलवतात का नाही, माझ्या निष्ठेवर त्यांना शंका आहे का? असे बालिश प्रश्‍न आणि अर्थ काढत बसण्यापेक्षा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुठल्या तोंडाने मतदारसंघातील जनतेपुढे जायचे, याचा विचार करीत बसा. असाही टोला आ. शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.

पाटण – खासदार उदयनराजे भोसले यांच्याबरोबरचे आमचे नाते राजकारणापलीकडचे आहेत. म्हणून मी जाहीरपणे त्यांच्या जाहीर सत्काराला गेलो होतो. तुम्हीच पिता-पुत्र राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून जाहीर कार्यक्रमाला का जावू शकला नाही, याचे उत्तर तालुक्‍यातील जनतेला द्या. मग तुम्ही विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊ, असा टोला आ. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना पत्रकाद्वारे लगावला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, पाटण मतदार संघात मी चार वर्षात कोट्यावधी रुपयांचा विकास केला आहे. म्हणूनच छातीठोकपणे गावोगावी आणि गल्लीबोळात जाऊन जनतेला केलेली विकासकामे सांगत आहे. तुमच्याकडे त्याच गावात आणि गल्लीबोळात जाऊन सांगण्यासारखे आहेच काय?

-Ads-

तालुक्‍याच्या आमदारांनी कोट्यावधी रुपयांचा विकास मतदार संघात केला आहे. आणि सुरु आहे. ही आमदारांची जमेची बाजू आपण कशी थोपवणार. ज्यांनी 2014 साली आणि त्या आगोदरही भावकी म्हणून आणि पक्षातील म्हणून तुम्हाला मदत केली होती. ती मान्यवर मंडळी आता पक्षातून बाहेर जाऊन आमदारांच्याबरोबर दिसत आहेत. आता आपले कसे होणार, मग निर्मल म्हणवून घेणारे सभापतीमहोदय, सहानभुतीची वेळ कोणावर आली आहे, याचा विचार बारकाईने करा. कोट्यावधीचा विकास करुन जनता निवडणुकीत मला निवडून आणेल का पाडेल हे जनता ठरवेल.

तुम्ही किती पाण्यात आहात, हे आधी बघा आणि मग आमचा जय-पराजय ठरवा. मतदार संघातील जनतेने निवांत बसण्याचा सल्ला तुम्हा पितापुत्रांना दिला आहे. त्यामुळे माझ्या निवांतपणाची काळजी तुम्ही करु नका, असेही पत्रकात म्हटले आहे. पाटणकरांनी केलेल्या रस्त्यांचे कौतुक करण्याअगोदर ते राज्याच्या मंत्रीपदावरुन पायउतार झाले. तेव्हा या तालुक्‍यात किती गावांना आणि वाड्या-वस्त्यांना बारमाही रस्ते नव्हते. आणि आता त्यानंतर व आत्ताच्या चार वर्षात किती गावांना आणि वाड्या-वस्त्यांनाबारमाही रस्ते झाले. याची आकडेवारी बघा म्हणजे समजेल तुमच्या पिताश्रींनी पवनचक्‍क्‍यांचे केलेले रस्ते स्वतःच्या स्वार्थसाठी केले. त्याचा जनतेला शून्य उपयोग झाला. येणाऱ्या निवडणुकीत हीच जनता तुम्हाला आस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)