“आधार लिंक’च्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी – आधारकार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची माहिती घेऊन 40 हजार रुपये परस्पर हस्तांतरित केले. हा प्रकार मंगळवारी (दि. 4) दुपारी दोनच्या सुमारास वाकड येथील कस्पटेवस्ती परिसरात उघडकीस आला.

या प्रकरणी अरुंद्धती तारनाथ जेरे (वय-74, रा. निसर्गसृष्टी, कस्पटेवस्ती, वाकड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

जेरे यांच्या मोबाईलवर एका अनोळखी इसमाने फोन करून बॅंकेतून बोलत असल्याचे सांगितले. बॅंक खात्याशी आधारकार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने आरोपीने त्यांच्याकडून एटीएम कार्डची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर काही वेळात फिर्यादी महिलेच्या खात्यावरील 39 हजार 980 रुपये परस्पर हस्तांतरित करून त्यांची फसवणूक केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)