आधार ठरला ऑक्‍सफर्ड डिक्‍शनरीचा हिंदी वर्ड ऑफ दि ईयर

जयपूर -आधार हा शब्द ऑक्‍सफर्ड डिक्‍शनरीचा हिंदी वर्ड ऑफ दि ईयर (2017) ठरला आहे. सध्या सुरू असलेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली. मागील वर्षी अनेक हिंदी शब्द चर्चेत राहिले. त्यांचा विचार वर्ड ऑफ दि ईयर ठरवण्यासाठी करण्यात आला. हा मान मिळवण्यासाठीच्या स्पर्धेत मित्रों, नोटबंदी आणि गोरक्षक यांसारखे शब्द होते.

त्यात आधारने बाजी मारली. केंद्र सरकारने आणलेल्या आधार कार्डमुळे हा शब्द मोठ्या चर्चेतील ठरला आहे. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यावरून व्यापक चर्चेला तोंड फुटले आहे. एवढेच नव्हे तर, आधार कार्डचा विषय सर्वोच्च न्यायालयातही पोहचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)