नवी दिल्ली – आधार कार्ड नाही म्हणून कोणाही विद्यार्थ्याला प्रवेश नाकारू नये असे आदेश यूआयडीआयएने शाळांना दिले आहेत. अशा प्रकारे प्रवेश नाकारणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

काही शाऴांनी आधार क्रमांक नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारले आहेत. यूआयडीआयए ने अशा घटनांची गंभीर दखल घेतलेली आहे. आधार नाही म्हणून कोणत्याही मुलाला त्याचे अधिकार आणि लाभ यांपासून वंचित ठेवले जाऊ नये अशी यूआयडीआयए ची भूमिका आहे.

स्थानिक बॅंका, पोस्ट ऑफिसेस, राज्य शिक्षण संस्था आणि जिल्हा प्रशासन यांच्या मदतीने आधार साठी स्पेशल कॅंप्सची व्यवस्था केली पाहिजे. ही शाळांची जबाबदारी असल्याचे यूआयडीआयए मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)