आधारसारख्या उपक्रमातील प्रायव्हसी जपा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची भारताला सूचना
वॉशिंग्टन – आधार सारख्या नागरीकत्वाची ओळख देणाऱ्या कार्डांच्या योजनेच्या बाबतीत भारताने नागरीकांची प्रायव्हसी जपली पाहिजे आणि त्या विषयीच्या सुरक्षेची पुरेशी दक्षता घेतली पाहिजे अशी सुचना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताला केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या फिस्कल मॉनिटर रिपोर्ट मध्ये ही सुचना करण्यात आली आहे. सरकारी व्यवस्थापनाचे डिजीटलायझेशन केले जाणे ही चांगली बाब आहे त्यातून चांगले गव्हर्नन्स दिले जाऊ शकते पण हे करताना भारतासारख्या देशांनी नागरीकांची खासगी माहिती जाहींर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतात करण्यात आलेल्या डिजीटलायझेशनमुळे किंवा इलेक्‍ट्रॉनिक पेमेंटमुळे एलपीजी गॅस सिलींडरच्या सबसीडीमध्ये होणारी गळती मोठ्या प्रमाणात थांबली आहे. भारतात आधार नोंदणीचे काम मोठ्या प्रमाणावर झाले असून सुमारे 120 कोटी लोकांनी त्यासाठीचे रजिस्ट्रेशन केले आहे. हे या क्षेत्रातील लक्षणीय काम आहे असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आधार कार्डासाठी स्वत:ची ज्यांनी व्यक्तीगत माहिती सादर केली आहे अशा 135 दशलक्ष लोकांची माहिती बाहेर फुटली आहे त्यामुळे याबाबतीत सुरक्षेची उपाययोजना करणे हे अत्यंत आवश्‍यक ठरले आहे.

आधार कार्ड नोंदणीसाठी आलेल्या खर्चाचाही विचार या अहवालात करण्यात आला असून त्यात म्हटले आहे की सन 2009 ते 2017 या अवधीत नोंदवण्यात आलेल्या आधार कार्डांसाठी एकूण 1.5 बिलियन अमेरिकन डॉलर्स इतका खर्च आला आहे. म्हणजेच प्रत्येक कार्डासाठी सरासरी 1.25 डॉलर्स इतका खर्च आला आहे. साधारणपणे इलेक्‍ट्रॉनिक आयडेंटिफिकेशन नोंदणीसाठी एका व्यक्तीसाठी 3 ते 6 डॉलर्स खर्च येतो त्या तुलनेत भारतात झालेले काम अधिक स्वस्तात झाले असल्याचे निरीक्षणही नाणेनिधीने नोंदवले आहे. पण या सिस्टीममध्ये हस्तक्षेप करणे आणि त्यात अनाधिकृतपणे घुसखोरी करणे या चिंतेच्या बाबी असून त्याविषयी भारताने पुरेसे सिक्‍युरिटी कंट्रोल ठेवणे आवश्‍यक आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)