आधारशिवाय मिळणार नाहीत तुम्हाला या सुविधा….

* बँक अकाऊंट : जर तुम्हाला एखाद्या बँकेत तुमचे अकाऊंट सुरू करायचे आहे, तर अगोदर आधार क्रमांक बँकेला द्यावा लागेल. सोबतच आपले बँक अकाऊंट आधार क्रमांकाला जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. ५० हजार रुपयांपासून अधिक रकमेचं ट्रान्झक्शन करायचं असेल तर आधार आणि पॅन क्रमांक गरजेचा आहे.

* इन्कम टॅक्स : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी पॅनसोबतच आधार क्रमांकही गरजेचा आहे.

* प्रोव्हिडेंट फंड : तुम्हाला पॅन क्रमांकासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे अगोदर आधार क्रमांक असणं गरजेचं आहे. शिवाय तुमच्याकडे अगोदरपासून पॅन क्रमांक असेल तर तो आधार क्रमांकाशी जोडणं गरजेचं आहे.

* प्रोव्हिडेंट फंड : एम्प्लॉई प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) नं आधार कार्डला प्रोव्हिडंट फंडशी जोडणं अनिवार्य केले आहे.

* मोबाईल सीम कार्ड : आता तर आपल्या हातातील मोबाईल क्रमांकही आधार कार्डला लिंक करणं अनिवार्य करण्यात आलंय. अन्यथा तुमचा मोबाईल क्रमांक बंद होऊ शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या नव्या नियमांनुसार, सिम कार्डसाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे.

* पासपोर्ट : परदेश मंत्रालयानं पासपोर्ट बनवण्यासाठी तसंच पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी आधार क्रमांक गरजेचा केला.

* सार्वजनिक वितरणाचा लाभ : सार्वजनिक वितरणाचे फायदे (PDS)मिळवण्यासाठीही तुम्हाला आधार क्रमांक सादर करणं गरजेचं आहे. PDS सबसिडीचा लाभ घेण्यासाठी राशन कार्डला आधार कार्डशी लिंक करून घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)