आधारला पॅन जोडण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत

नवी दिल्ली- “आधार’ क्रमांकाला “पॅन’ जोडण्याची मुदत सरकारने आणखी चार महिन्यांनी वाढवली. आता सर्व करदाते 31 डिसेंबरपर्यंत पॅनला आधार जोडू शकणार आहेत. महसूल विभागाच्यावतीने तसे अधिसूचित केले जाणार आहे. विविध सरकारी योजनांचा फायदा मिळण्यासाठी नागरिकांसाठी पॅन आधारला जोडण्याची मुदत यापूर्वीही वाढवण्यात आली होती.

याशिवाय आधारला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यासंबंधीची पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. त्यामुळेही ही मुदतवाढ दिली गेल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राप्तीकर कायद्याच्या कलम 139 एए (2) नुसार 1 जुलै 2017 रोजी पॅनकार्ड धारक असलेल्या आणि आधार पात्र असलेल्या व्यक्‍तीने आधारचा तपशील कर विभागाला कळवणे अनिवार्य आहे. मात्र अनिवासी भारतीय, भारतीय नागरिकत्व नसलेले, 80 वर्षांवरील वय असलेले आणि आसाम, मेघालय, जम्मू काश्‍मीरच्या नागरिकांना या अटीतून वगळण्यात आले आहे.

ज्या नागरिकांकडे आधार नाही ते आपला आयकर परतावा दाखल करू शकतात. मात्र जोपर्यंत ते आधार क्रमांक सादर करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या परताव्यावर प्रक्रिया केली जाणार नाही. आधारला घटनात्मक वैधता प्राप्त होत नाही तोपर्यंत कर परतावे सादर करणाऱ्यांना आधार पॅनला जोडणे अनिवार्य असेल. त्यासाठी 31 ऑगस्ट 2017 पर्यंतची मुदत असेल, असे करविभागाच्यावतीने 31 जुलै रोजी म्हटले होते. बॅंक खात्यांनाही आधार क्रमांक जोडण्याची मुदतही 31 डिसेंबरपर्यंतच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)