‘आधार’मधील मोबाईल नंबर बदलायचाय? मग हे वाचाच

आजमितीला आधार कार्ड किती महत्त्वाचे आहे, हे आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. बॅंक, स्वयंपाकाचा गॅस कनेक्‍शन, रेशनकार्ड, पासपोर्ट यासारख्या विविध सेवांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्डवरील माहिती ही कालांतराने कालबाह्य होऊ शकते. जसे की घराचा पत्ता, मोबाईल क्रमांक. काही कारणाने आपण घर बदलतो किंवा मोबाईल क्रमांकही बदलतो. अशावेळी आधार कार्डवर जुनाच क्रमांक आणि पत्ता राहतो. अर्थात आधार कार्ड काढण्यासाठीच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, अशा स्थितीत आधार कार्ड पुन्हा अपडेट करण्याच्या भानगडीत फारसे कोणी पडत नाही. परंतु अपडेट माहिती नमूद करणे अत्यावश्‍यक आहे. जर आधारवरील माहिती अपडेट न केल्यास काहीवेळेस तांत्रिक अडचणींमुळे आपले काम अडू शकते. मोबाईल क्रमांक बदलला असेल तर तो आधारमध्ये कसा अपडेट करावा, यासंदर्भातील माहिती इथे देता येईल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण स्वत: ऑनलाईनवरून आधार कार्डमधील मोबाईल क्रमांक बदलू शकत नाहीत. याबाबतची माहिती खुद्द यूआयडीएआयने दिली आहे.

जर आपल्याला आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलून घ्यायचा असेल तर आधारच्या संकेतस्थळावर जावे लागेल. तेथे आधार ऑनलाइन सर्व्हिसचा पर्याय दिसू लागेल. त्यापैकी आधार एनरॉलमेंट सेक्‍शनमध्ये एनरॉलमेंट अँड अपडेट सेंटर इन बॅंक्‍स अँड पोस्टवर क्‍लिक करा. यानंतर नवीन विंडो सुरू होईल. त्यात आपल्याला राज्य, जिल्हा आणि शहराची विचारणा होईल. यात आपण सध्याचा जिल्हा आणि शहर टाकू शकता. इथे घराचा पत्ता नमूद करणे बंधनकारक नाही.

आपल्यासमोर बॅंक आणि पोस्ट ऑफिसच्या इनरॉलमेंट सेंटरची यादी येईल. यानंतर आपण या सेंटरवर जावून 30 रुपये शुल्क भरून आधार कार्डवर नवीन मोबाईल क्रमांक अपडेट करू शकता. याशिवाय आपल्या घराजवळ एखादे आधार सेंटर असेल तर त्याठिकाणी देखील मोबाईल क्रमांकात बदल करून आणू शकता.

– शैलेश धारकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)