आधारमधील माहिती जपण्याची गरज

वॉशिंग्टन – आधारसारखी देश पातळीवरील नागरिक ओळख योजना राबविताना त्याच्या सुरक्षा आणि गोपनीयतेची काळजी सरकारकडून घेणे आवश्‍यक आहे असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले. सरकारकडून डिजिटलकरणास प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे प्रशासकीय व्यवहार अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल. सरकारकडून होणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणि भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल असे अहवालात म्हणण्यात आले. आधार उपक्रमामुळे एलपीजी अनुदानातील गळती रोखण्यास सरकारला यश आले आहे. देशातील 1.2 अब्ज लोकांकडे आधार कार्ड असून ही जागतिक पातळीवर मोठी आकडेवारी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)