आधारचे सॉफ्टवेअर झाले हॅक-कोणीही बदलू शकतो नाव-पत्ता…..

नवी दिल्ली: आधार कार्डाचे सॉफ्टवेअर “हॅक’ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हफिंग्टन पोस्ट.कॉम ने असा दावा केला आहे, की आधार कार्डचे सॉफ्टवेअर “हॅक’ झाले आहे आणि केवळ 2500 रूपयांत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुमचे नाव आणि पत्ता बदलला जाऊ शकतो. यामुळे एक अब्ज भारतीयांची गोपनीय माहिती धोक्‍यात आली आहे.

आधार कार्डाच्या सुरक्षिततेबाबत फार दिवसांपासून वाद चालू आहे. आधारसाठी फेस रिकग्निशन टेक्‍निक (चेहऱ्यावरून ओळख तंत्र) साठी काम करत असल्याचे यूआयडीएआय (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने अलीकडेच जाहीर केले आहे. आणि त्याच दरम्यान आधार सॉफ्टवेअर “हॅक’ झाल्याची माहिती उघड झाली आहे.

आधार सॉफ्टवेअर हॅक करून तयार करण्यात आलेल्या सोफ्टवेअरमुळे आधार कार्डात फेरफार करणे आणि नवीन आधार कार्ड तयार करणे सहज शक्‍य झाले आहे. आणि हे सॉफ्टवेअर फक्त अडीच हजार रुपयांत व्हाटऍपवर उपलब्ध करण्यात आले आहे. यू ट्यूबवरही असे अनेक व्हिडियो आहेत, त्यात एका कोडने कोणाच्याही आधार कार्डात हेरफार करता येऊ शकतो. यूआयडीएआयने टेलिकॉम कंपन्यांना आधारचा अधिकार (access) दिला त्या काळातच त्यातील त्रुटी उघड झाली होती. आणि आता कोणीही त्याचा गैरफायदा घेऊ शकणार आहे असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, या अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे. यामुळे धोका निर्माण होण्याची स्थिती असून योग्य ते उपाय केले जाण्याची आम्हाला अपेक्षा असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

यूआयडीएआयने दावा फेटाळला: आधारबाबत हा जो दावा करण्यात आला आहे, त्यात किंचितही तथ्य नसल्याचे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे. हा अहवाल काल्पनिक असून अत्यंत बेजबाबदारपणाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आधारचा डाटा पूर्णत: सुरक्षीत असून जगातली कोणतीही शक्ती त्याची सुरक्षा भेदू शकत नाही. आधार कसे कामाचे नाही, हे सिध्द करण्याचा काही लोक आणि संघटना सातत्याने प्रयत्न करत असून त्यांचा हा दावा त्याच मालिकेतला एक भाग आहे असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)