आधारकार्ड निर्णयावर ‘कहीं खुशी कहीं गम’

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज ‘आधारकार्ड’च्या वैधतेबाबत एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने निर्णय देताना आधारकार्ड वापरणे कुठे अनिवार्य आहे व कुठे नाही, याबाबत आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ‘सामान्य’ माणसाला आता आधार जोडणीबाबत दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत ‘कहीं खुशी कहीं गम’चे वातावरण पाहायला मिळत आहे. या निकालावर समाधानी असणाऱ्यांच्या मते आधारकार्डच्या अनिवार्यतेबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच बंधने घातली असल्याने सामान्य माणसाची होणारी धावपळ थांबणार आहे. तर या निर्णयावर समाधानी नसणाऱ्यांमध्ये सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डला अनिवार्य ठेवल्यामुळे मूलभूत अधिककारांवर गदा येत असल्याचा सूर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)