आधारकार्डसाठी औंधकरांचे हेलपाटे

औंध – औंध पंचक्रोशीतील लोकांना आधार कार्ड मिळवण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. महा-ई-सेवा केंद्र असो वा सरकारी पोस्ट ऑफिस असो, त्याठिकाणी ज्या सुविधा मिळाव्यात त्या सुविधांसाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे.
कोणत्याही नोंदी करण्यासाठी व प्रशासकीय कामांसाठी लागणारी गोष्ट म्हणजे आधार कार्ड. परंतु, हेच आधार कार्ड मिळवणे व त्यातील चुका दुरुस्त करणे ही अत्यंत कसरतीची गोष्ट ग्रामीण भागात झाली आहे.

औंधमध्ये कोणत्याही ठिकाणी आधार कार्ड सुविधा सुरू नसल्यामुळे गेले अनेक महिने लोकांना आपले काम व्यवसाय सोडून तालुक्‍याच्या ठिकाणी जावे लागत आहे. तालुक्‍याच्या ठिकाणी लोकांना तीन-चार हेलपाटे घातल्याशिवाय आधार कार्ड मिळत नसल्यामुळे लोकांना अतिशय नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लोकांच्या आर्थिक देवाण-घेवाणीसाठी पॅन कार्ड महत्वपूर्ण मानले जात असल्याने पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्डची आवश्‍यकता असल्याचे सांगितले जाते. त्याअनुषंगाने आधार कार्ड काढण्यासाठी पळापळ सुरू आहे. काही आधार कार्डमधील झालेल्या चुका सुधारण्यासाठी लोकांची पळापळ सुरू आहे. प्रशासन कोणत्याही कामासाठी आधार कार्ड सक्तीचे असेल तर आधार कार्ड बनवणारी केंद्र सुरू ठेवणे हेही सक्तीचे करावे, अशी मागणी लोकांमधून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)