आदेश झुगारून मंगल कार्यालयाचे बांधकाम

फलटण – फलटण-आसू रस्ता प्रजिमा 7 कि. मी.15/500 डाव्या बाजूला मंगल कार्यालयाचे बांधकाम साठे फाटा, शेंडे वस्तीनजिक मंगल कार्यालयाने बांधकाम शासकीय नियम धाब्यावर बसवून बांधकाम खात्याने सदर बांधकाम बेकायदेशीर असुन शासकीय नियमांचे उल्लंघन करणारे असुन सदर बांधकाम थांबण्यात यावे असा आदेश लेखी पञाव्दारे देण्यात येवून सुध्दा या आदेशाला न जुमानता बांधकाम सुरू असुन संबंधित जबाबदार अधिकारीनी त्वरीत कायदेशीर करावी अशी मागणी मच्छिद्र धर्माधिकारी यांनी केली आहे.

लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे संगनमताने बांधकाम सुरू आहे. सदर बेकायदेशीर बांधकामाबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी श्री. तांबे यांना विचारले असता नोटीस देण्याची ती आम्ही दिली आहे. मग प्रश्‍न येतो बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कोण कारवाई करणार? रस्त्याशेजारी बेकायदेशीर सुरू असलेली बांधकामकामे त्वरीत थांबवणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी कर्मचारी यांची जबाबदारी असते, ती जबाबदारी टाळून बेकायदेशीर बांधकामाला अभय दिले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्वरित बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई करावी अन्यथा कायदेशीर मार्गाने मी लढाई लढणार आहे. जबाबदार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारीनी आपली जबाबदारी टाळून टाकण्याचा प्रकार घडत असल्याचे निर्देशास येत आहे. याची त्वरीत चौकशी करावी अशी मागणी धर्माधिकारी यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)