आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन

पारंपरिक नृत्य, हस्तकला प्रदर्शन आणि लघुपट आदींचे आकर्षण


25 ते 29 ऑक्‍टोबरपर्यंत महोत्सवाचे आयोजन

पुणे – आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत आदिवासी कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्विन्स गार्डन येथील संस्थेच्या आवारात दि. 25 ते 29 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत हा महोत्सव असणार आहे. या महोत्सवांतर्गत आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपरिक नृत्यस्पर्धा व आदिवासी जीवनावर आधारित लघुपट दाखविणे आदी कार्यक्रम असणार आहेत.

आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे, उपसंचालक हंसध्वज सोनवणे, लेखाधिकारी विनित सोनवणे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी आयुक्त कुलकर्णी म्हणाले, आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून कलाकार सहभागी होणार आहेत. महोत्सवात पुणेकरांना आदिवासी संस्कृती जवळून अनुभवायला मिळणार आहे. याठिकाणी उभारलेल्या प्रदर्शनात आदिवासींनी बनवलेल्या विविध वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. यातून आदिवासींना आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.

महोत्सवातील हस्तकला प्रदर्शनात महाराष्ट्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून सुमारे 70 आदिवासी हस्तकलाकारांनी सहभाग घेतला आहे. यात वारली चित्रकला, बांबूच्या व वेताच्या वस्तू, धातूच्या कलाकुसरीच्या वस्तू, आदिवासी दाग-दागिने, गोंड कलाकाम, तोरण, विविध प्रकारचे मुखवटे तसेच वनऔषधी आदी वस्तू नागरिकांना पाहण्यास व विकत घेण्यास मिळणार आहेत. हे प्रदर्शन येत्या 29 ऑक्‍टोबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील. तसेच आदिवासी पारंपरिक नृत्यस्पर्धेसाठी प्रकल्प स्तरावरील उत्कृष्ट नृत्यपथकांना महोत्सवाकरिता आमंत्रित करण्यात आले आहे. नृत्यस्पर्धा कार्यक्रम दिनांक 26 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत होईल, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)