आदिवासी वेशात विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

वाल्हे- राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत हरणी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आदिवासी वेशभूषा परिधान करून स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे नृत्य सादर करून त्यांच्या प्रश्नांनाकडे सर्वांचे लक्ष वेधले. स्वच्छते विषयक जनजागृती व संदेश देण्यासाठी हरणी गावत प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी गावात स्वच्छता मोहीम चालविण्यात आली.
विद्यार्थी गावात स्वच्छता करताना दिवसातच ग्रामस्थानी ही यामध्ये सहभाग घेतला. याच्या सांगता कार्यक्रमाच्या वेळी रामदास जगताप, ज्ञानदेव सुतार, सतिश पिसाळ, सुरेश जगताप, प्रियांका समगीर यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत विषयी माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक मधुकर जगतात, सरपंच स्वाती यादव, ज्ञानदेव सुतार व बाळासाहेब पठारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)