आदिवासी विभागाकडून उद्योजकता कौशल्य विकास कक्षाची स्थापना

पुणे- आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत उद्योजकता कौशल्य विकास आणि व्यवसाय जोपासना कक्षाची आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये स्थापन करण्यात आली आहे. या कक्षामार्फत आदिवासी युवक-युवतींसाठी कौशल्य विकासाद्वारे रोजगार क्षमता वाढवणे. तसेच आदिवासी समाजासाठी नाविण्यपूर्ण उपक्रमाद्वारे उत्पन्न निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडे कौशल्य विकास, उद्योजक घडवणे आणि नाविण्यपूर्ण उपक्रमाद्वारे आदिवासी युवक युवतींना उत्पन्न निर्मिती कार्यक्रम राबवणाऱ्या संस्थांना नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. उद्योजकता कौशल्य विकास आणि आदिवासी समाजातील पहिल्या पिढीच्या उद्योजकांसाठी व्यवसाय जोपासना आणि संवर्धन यांचा सदरील योजनेमध्ये समावेश असेल. इच्छुक संस्थांनी संस्थेच्या टीआरटीआय च्या trg.trti-mh@nic.in या इमेल आयडीवर उद्योजकता आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण प्रस्ताव 5 जुलैपर्यंत आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 या नावाने सादर करावेत, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)