आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळणार

राजगुरूनगर- आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. विविध स्पर्धा भरवून चांगले खेळाडू निर्माण करण्याचे शासनाचे प्रयत्न करीत आहेत. आदिवासी विभागाकडून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले, असल्याचे प्रतिपादन खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी राजगुरूनगर येथे केले.
खेड विभागाचे प्रांत तथा आदिवासी विकास प्रकल्पाचे पुणे विभागाचे प्रमुख आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव अंतर्गत राज्यातील शासनाच्या आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलाच्या मैदानात रविवारी (दि.27) घेण्यात आल्या. या स्पर्धांचे उद्‌घाटन आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुका प्रमूख प्रकाश वाडेकर, शहर प्रमुख सुनील टाकळकर, शेतकरी संघटनेचे एल. बी. तनपुरे, विभाग प्रमुख सुभाष कदम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर. बी. पंडोरे, समन्वयक गणेश गावडे, दीपक कालेकर नवनाथ भावरी, व्ही. एस. चव्हाण, उद्योजक संतोष सांडभोर, महसूल विभाग प्रतिनिधी निलेश घोडके, खेड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष रामदास रेटवडे, सचिव लतीफ शेख, अण्णासाहेब कोडक, जिल्हा शिवसहकार सेनेचे अध्यक्ष शंकर दाते, शाखा प्रमुख कैलास गोपाळे अशोक सांडभोर, संतोष काळे, सुनील नाईकरे, संकेत लोंढे, ऋषी खोमणे, मंगेश कुलकर्णी यांच्यासह विविध जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी खेळाडू शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेच्या सुरुवातीला राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यानी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते टॉस उडवून सामन्याची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गावडे यांनी करून आभार मानले.

  • आदिवासी वसतिगृहातील 350 विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण दिले जात आहे. यातून चांगले खेळाडू निर्माण करण्याचा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धांमधून राज्यपातळीवर खेळण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. येथे आलेल्या खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने खेळावे
    – आर. बी. पंडोरे, सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)