आदिवासी विकास प्रकल्पामार्फत मोफत गँस कनेक्शनचे वितरण- सवरा

पालघर – पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार प्रकल्प कार्यालयामार्फत प्रत्येकी पाच हजार गॅस कनेक्शनचे मोफत वितरण आदिवासी विभागाकडून करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले.

वाडा येथे पटारे हॉलमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील महिलांना मोफत गॅस कनेक्शन वाटप पालकमंत्री सवरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारत पेट्रोलियम मुंबईचे मॅनेजर सिद्धांत बर्वे, वनमाळी ट्रस्टच्या वैशाली वैभव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि डहाणू आदिवासी विकास प्रकल्प विभागातील या दोन्ही प्रकल्पामधून दहा हजार गँस कनेक्शन महिला वर्गाला मोफत देण्याचे सुतोवाच पालकमंत्री यांनी केले. चुल पेटविताना निघणाऱ्‍या धुरामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे वर्षभरात देशात हजारो महिला मृत्युमुखी पडतात त्यासाठी केंद्र सरकाराने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे, असे ही  सवरा यांनी सांगितले. यावेळी महिलांना कनेक्शन मिळवून देणाऱ्‍या वैशाली वैभव ठक्कर-पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

तालुक्यातील खानिवलीतही उज्ज्वला योजनेअंतर्गत बीपीएल रेशन कार्ड धारकांना मोफत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. केंद्र सरकारने या योजनेचे 2019 पर्यंत उद्दिष्ट गाठण्यासाठी आठ हजार कोटींचे बजेट ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती तथा वाडा पंचायत समितीचे सदस्य नंदकुमार पाटील यांनी दिली. यावेळी वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)