आदिवासी वस्ती सुधार योजनेसाठी दिड कोटी निधी

संग्रहित छायाचित्र....

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील ठक्‍कर बाप्पा योजनेअंतर्गत आदिवासी वस्ती सुधार योजनेसाठी 1 कोटी 48 लाख रुपयांची विविध विकासकामे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आली आहेत.
बोरघर येथील घोटमाळ येथे अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरणासाठी 6 लाख 44 हजार रुपये, डोण येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 7 लाख 50 हजार रुपये, न्हावेड येथे स्मशानभूमी बांधण्यासाठी 7 लाख रुपये, तिरपाड येथे स्मशानभूमी बांधण्यासाठी 7 लाख रुपये, चपटेवाडी अंतर्गत माळवाडी येथे सभागृह बांधण्याठी 7 लाख 50 हजार रुपये, बोरघर उंबरवाडी ते घोडेवाडी रस्ता डांबरीकरणासाठी 7 लाख 48 हजार रुपये, बोरघर येथील घोडेवाडी ते माळवाडी रस्ता डांबरीकरणासाठी 7 लाख 50 हजार रुपये, ग्रामपंचायत गोहे ग्रामसचिवालय बांधण्यासाठी 20 लाख रुपये, चपटेवाडी अंतर्गत धारेवस्ती नळपाणीपुरवठा योजनेसाठी 4 लाख 99 हजार रुपये, ग्रामपंचायत चपटेवाडी अंतर्गत ग्रामसचिवालय बांधण्यासाठी 7 लाख 50 हजार रुपये, ग्रामपंचायत चिखली अंतर्गत चिखली येथे संकुल इमारत बांधण्यासाठी 12 लाख 50 हजार रुपये, ग्रामपंचायत माळीण आमडे अंतर्गत माळीण जुने गावठाण ते चिंचेची वाडी रस्ता डांबरीकरणासाठी 12 लाख 50 हजार रुपये, ग्रामपंचायत माळीण आमडे येथील नदीलगत संरक्षण भिंत बांधण्यासाठी 7 लाख 50 हजार रुपये, गंगापूर खुर्द अंतर्गत गाडेकरवाडी येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी 12 लाख 50 हजार रुपये, गोहे बुद्रुक येथील करवंदे दरा ते आश्रमसलपर्यत खडीकरण व डांबरीकरणासाठी 20 लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)