आदिवासी मुलांच्या कलागुणांवर प्रकाश

राजगुरूनगर-वेताळे (ता. खेड) येथील आदिवासी ठाकरवस्तीमधील शाळा आणि शाळेतील विद्यार्थी यांच्या कलागुणांवर प्रकाश टाकणारे फोटो प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरासमोर आर्ट गॅलरी क्षेत्र 5 या संस्थेच्या माध्यामतून रेवा बोरावके, सत्यजित थोरात यांनी भरविले आहे.
खेड तालुक्‍यातील वेताळे केंद्रातील ठाकरवाडी (वेताळे) या 100 टक्के आदिवासी व दुर्गम भागातील शाळेत संदीप जाधव या शिक्षकाने तब्बल 15 वर्षे आदिवासी मुलांवर प्रेम करुन शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या व त्यांच्यामध्ये असलेल्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवन जगण्यास सक्षम करण्यासाठी अहोरात्र संदीप जाधव गुरुजींनी प्रयत्न केले आहेत. आदिवासी शाळेत केलेल्या कामाची दखल पुण्यात कार्यरत असलेल्या आर्ट गॅलरी क्षेत्र 5 या संस्थेने घेतली. संस्थेच्या प्रमुख रेवा बोरावके, सत्यजित थोरात यांच्या टीमने मार्च 2018 मध्ये संदीप जाधव या ध्येयवेड्या शिक्षकाच्या ठाकरवाडी वेताळे या शाळेस भेट दिली होती. या भेटी दरम्यान त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतला. विविध उपक्रमांची माहिती घेतली. विद्यार्थी व जाधव गुरुजीनिशी संवाद साधून विविध उपक्रमांची फोटोग्राफी केली.
ठाकरवाडी वेताळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांच्या फोटोचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदीरासमोर हॉटेल पर्ल शेजारील आर्ट गॅलरीमध्ये भरविले आहे. त्याचे उद्‌घाटन या ध्येयवेड्या शिक्षक संदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ अधिव्याख्याते डॉ. राजेश बनकर. रेवा बोरावके, सत्यजित थोरात, नंदकुमार मांदळे, शांताराम नेहेरे, हनुमंत जगताप, दत्तात्रय बोडरे, सतीश जाधव, तानाजी खैरे, केंद्रप्रमुख गजानन पुरी, राजाराम बोंबले आशा बोंबले, रामचंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर तळेकर, विलास गारगोटे उपस्थित होते.

  • संदीप जाधव यांचे ग्रामीण भागातील आदिवासी ठाकरवस्तीत असलेल्या शाळेतील काम पाहता ते शिक्षकांमधील हिरो बनले आहेत. येथील आर्ट गॅलरी क्षेत्र 5 मध्ये त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणाचे फोटो प्रदर्शन भरवून या शिक्षकाच्या कामाला न्याय दिला आहे. संदीप जाधव यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगला शिक्षक मिळाला तर इतर शिक्षक सहकाऱ्यांना प्रेरणा देणारा सहकारी मिळाला आहे.
    -डॉ. राजेश बनकर, ज्येष्ठ अधिव्याख्याते
  • जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे प्रदर्शन पहिलांदाच एका आर्ट गॅलरीमध्ये भरविले आहे. हा एक मोठा दुर्मिळ क्षण आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो. जिल्ह्यातील एका ग्रामीण आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या फोटोचे प्रदर्शन इतरांसाठी प्रेरणा आहे. आम्ही केलेल्या प्रामाणिक सेवेचा हा मोठा सन्मान आहे.
    संदीप जाधव, शिक्षक वेताळे ठाकरवाडी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)