आदिवासी अकोले तालुका विकासासाठी दत्तक

अकोले – अकोले तालुका विकासाच्या दृष्टीने मागासलेला आहे. त्याचा विकास व्हावा म्हणून हा तालुका आपण विकासासाठी दत्तक घेत आहोत.अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी सोमवारी केली. शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढण्याची भाषा केल्याने पक्षाचे टेन्शन गेले आहे, असा शिवसेनाला टोला लगावून दिवंगत आमदार यशवंतराव भांगरे हे सामान्यांसाठी झिजणारे लोकप्रतिनिधी होते. अशी पुस्तीही ना. सावरा यांनी जोडली.

अकोले तालुक्‍याचे दिवंगत आमदार यशवंतराव भांगरे यांच्या 36 व्या स्मृतिदिनाचे आज शेंडी-भंडारदरा येथे आयोजन केलेल्या विविध मान्यवरांना भांगरे स्मृतीप्रित्यर्थ ना. सावरा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडल्यानंतर आदिवासी मेळावा झाला. त्यावेळी ना. सावरा बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे हे होते.
ना.सावरा म्हणाले, यशवंतराव भांगरे हे तोंडात साखर, डोक्‍यावर बर्फ व पायाला भिंगरी लावून समाजाचे प्रश्न मार्गी लावणारे आमदार होते. त्यांच्या मनात पद असूनही मोठेपणाची भावना नव्हती, अशा शब्दात त्यांनी भांगरे यांचा गौरव केला. अशोक भांगरे हे आमच्या पक्षात उशीरा आल्याची मिश्‍कील शेरेबाजीही त्यांनी केली.ते म्हणाले, अकोले तालुक्‍याला दीर्घकाळ आमदारकी व मंत्रीपद होते. मात्र विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी यापुढे आपण अकोले तालुका दत्तक घेत असल्याची घोषणा त्यांनी केली. यापुढे पालघर बरोबरच आपण अकोल्याला विकासाच्यासाठी लक्ष देवू, अशी ग्वाही दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)