आदिनाथ कोठारे- उर्मिला होणार लवकरच आई-बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील एक जोडी म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे. दोघेही सर्वांनाच तेवढेच परिचित आहेत. दरम्यान, आता हे दोघे लवकरच आई-बाबा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका चित्रपटाच्या  निमित्ताने झालेल्या दोघांच्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि ते आयुष्यभराचे साथीदार बनले.
उर्मिला आणि आदिनाथ यांची पहिली भेट आदिनाथच्या घरीच झाली होती. महेश कोठारे त्यावेळी शुभमंगल सावधान या चित्रपटाच्या तयारीत होते. याचित्रपटासाठी ते हिरोइनच्या शोधात होते. त्याच कामाच्या निमित्ताने उर्मिला, महेश कोठारे यांना भेटायला त्यांच्या घरी आलेली होती. पण त्यावेळी उर्मिला कोठारेंच्या घरी आली आणि असे काही घडले की, पुढे आयुष्यभरासाठी तेच उर्मिलाचे घर बनले. हे सर्व एका चित्रपटाच्या निमित्ताने घडले असले तरी त्याची संपूर्ण स्टोरी ही अत्यंत रंजक अशी आहे. त्यांचा हा सुरु झालेला प्रवास आजही तेवढाच सुखकारक आहे. त्यात आता या दोघांच्या संसाररूपी वेलीवर लवकरच एक फुल उमलणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)