आदित्य नारायणच्या शालीन वर्तनाने भारावली ईशा सिंह!

‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ या गाण्यातील स्पर्धेचा आरंभ भव्य प्रमाणात झाला असून यातील अतिशय गुणी आणि सफाईदार गायकांमुळे प्रेक्षक मोहित होऊन गेले आहेत. आता या स्पर्धेची पहिली बाद फेरी सुरू होत असल्यामुळे स्पर्धकांनी आपली कामगिरी जास्तीत जास्त अचूक कशी होईल, याकडे विशेष लक्ष दिले आहे. आता येत्या वीकेण्डच्या भागात ‘झी टीव्ही’वरील लोकप्रिय मालिकांमधील काही नामवंत कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार असून ते आपल्या पसंतीच्या स्पर्धकाला उत्तेजन देणार आहेत.

या भागादरम्यान कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायण याने ‘झी टीव्ही’वरील एक रूपसुंदर अभिनेत्रीवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. या वाहिनीवरील ‘इश्क सुभान अल्ला’ या मालिकेत झाराची भूमिका रंगविणारी देखणी अभिनेत्री ईशा सिंह ही प्रतीक्षा देका आणि सुशांत दिवगीकर या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आली होती. पण आदित्यच्या आकर्षक स्वभावामुळे तिने त्याच्याबरोबर ‘इश्कवाला लव्ह’ या गाण्यावर एक मदभरे नृत्य करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या दोघांनी स्लो-मोशनमध्ये नृत्य केले, एकमेकांबरोबर फेरे धरले आणि शेवटी आदित्यने गुडघ्यावर बसून आएशापुढे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली! यावेळी भारलेल्या वातावरणात लाल फुगे हवेत उडविण्यात आले आणि नृत्य करताना एका क्षणी ईशाचा पाय घसरून ती खाली पडणारच होती, पण ऐन वेळी आदित्यने तिला सावरले.

-Ads-

ईशा म्हणाली, “आदित्य फारच गोड आणि कनवाळू स्वभावाचा आहे. मी काही उत्तम नर्तिका नाहीये, पण त्याने मला सांभाळून घेतलं आणि म्हणूनच आमचं नृत्य फार छान झालं. तसंच कॅमेरा सुरू असताना मी पाय घसरून जवळपास खाली पडणारच होते, तेव्हा आदित्यने मला योग्य वेळी सावरलं आणि आमचं नृत्य सुरूच ठेवलं. हा एक फारच छान अनुभव होता आणि आदित्यबरोबर नृत्य करतानाही खूप मजा आली.”

आता ही स्पर्धा दिवसेंदिवस अवघड होत चालली असून प्रेक्षक, परीक्षक आणि ज्यूरी सदस्यांना खुश करण्यासाठी स्पर्धकांना आपल्या गाण्याची कामगिरी जास्तीत जास्त सरस करावी लागत आहे. येत्या वीकेण्डला प्रेक्षकांना ‘सा रे ग म प’ कार्यक्रमाचा एक धमाल भाग पाहायला मिळणार असून त्यांच्यासाठी ही एक दृक्-श्राव्य पर्वणीच असेल कारण हे दोन्ही भाग ‘झी कुटुंब’ या संकल्पनेवर आधारित असतील. या कार्यक्रमात ‘तुझे है राबता’ मालिकेतील एसीपी मल्हार राणेने (सेहबान अझीम) कोलकात्याच्या सुप्रीत चक्रवर्तीला पाठिंबा दिला होता; तर ‘कुंडली भाग्य’मधील शेर्लिनने (रूही चतुर्वेदी) कार्यक्रमातील सर्वांचा लाडका ‘मुंडा’ साहिल सोलंकी याला पाठिंबा दिला होता. साहिलने ‘टशन में’ हे गाणे गाऊन सर्वांना खुश केले होते. ‘लखनौ के हेडफोन नबाब’ तन्मय चतुर्वेदी याने ‘आँखिया उडित दिया’ हे गाणे गाऊन सर्वांचे मनोरंजन केले, तर गुरबिंदरच्या ‘अभी मुझमें कहीं’ या जादुमयी गाण्याने सर्वांना काहीसे भावूक केले. थोडक्यात ‘सा रे ग म प’च्या ‘झी कुटुंब संग होगा रिश्तों का जश्न’ या संकल्पनेवर आधारित या वीकेण्डच्या भागांमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणीच मिळणार असून काही आनंदाश्चर्याचे धक्केही बसणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)