आदित्य ठाकरे हे मुंबईकरांसाठी अननोटिस्ड !

आशिष शेलारांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मुंबईकरांसाठी अननोटिस्ड म्हणजेच अदखपात्र असल्याचे सांगत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंसाठी मुंबईचे प्रश्न वेगळे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आदित्य ठाकरे यांच्यासाठी मुंबईची ओळख म्हणजे रात्रीचे बाजार आणि रुफ टॉप पार्टी आहे. मात्र मुंबईत हे प्रश्न असल्याचे आम्हाला माहित नाही, असे आशिष शेलारांनी सांगितले. तसेच रात्रीचा बाजार, रुफ टॉप पार्टीमध्ये नाच हीच आदित्य ठाकरे यांची ओळख असल्याची टीकाही शेलारांनी केली आहे. आमच्यासाठी मुंबईचे प्रश्न वेगळे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईसाठी भाजपचे प्रश्न रस्ते, पिण्याचं पाणी हे आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे प्रश्न मुंबईची दखल कितपत घेतात असा अप्रत्यक्ष टोलाच शेलारांनी लगावला आहे. ज्यांच्या पायाखालून वाळू घसरली आहे ते रोज नवनवे आरोप करत आहेत अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे. भाजपचा विरोध करण्यासाठी हार्दिक पटेलला शिवसेनेने राजकीय आखाड्यात आणल्याचे शेलारांनी म्हटले आहे, कधी अखिलेश यादव तर कधी युपी निवडणूक असे विषय काढून शिवसेना सर्वसामान्यांच लक्ष दुसरीकडे वळवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)